लोहार समाजाचे आदरणीय ऍडव्होकेट बळवंतरावजी ढोले यांचे अभिष्टचिंतन..

Share news

प्रतिनिधी/ अमरावती : अमरावती येथील सर्वांना परिचित साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून आपले स्थान निर्माण करणारे, स्पेशल ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट या पदाचा पदभार सांभाळणारे लोहार समाजातील पहिले व्यक्तिमत्व आदरणीय बळवंतरावजी ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोहार समाज हितकारणी मंडळाचे अध्यक्ष रविभाऊ हिवलेकर तसेच यांच्या समवेत गणेश सालपे,अनेक समाजसेवी संस्थेचे , संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले…

यावेळी झुंज समाजसेवी संघटनेचे किशोर तायडे , अविनाश सावळेकर, पंकज तांबडे विनोद सोनवणे , सारंग गचके,प्रफुल बांबल,रतन बाणेवार प्रवीण सरदार, मोहनजी कोठार, सुभाष चोपकर, अंकुश मोरे , प्रमोद घाटे यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या…