आमदार वैभव नाईक यांनी घेतले असरोंडीतील श्री लिंगेश्वर पावणादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीचे दर्शन. 

Share news

मालवण : श्री लिंगेश्वर पावणादेवी नवरात्र उत्सव मंडळ, असरोंडी या मंडळाच्या देवीचे कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार मा. श्री.वैभव जी नाईक यांनी दर्शन घेतले व देवीची आरती केली.

गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते ह्या वेळी उपस्थित होते. वेष भुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धाकांचे अभिनंदन मा. आमदार यांनी केले. त्याच बरोबर अतिशय उत्तम पद्धतीने नवरात्र उत्सवाचे नियोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले.

प्रती वर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या बद्दल सर्व गावकरी मंडळी व मंडळाचे कार्यकर्ते यांनी मा. आमदार वैभव जी नाईक यांचे आभार मानले.

Local News 247 Local News 247 Local News 247