माणगावमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात: बस ५० फूट दरीत कोसळली..

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे

माणगाव – लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणाऱ्या बसला रायगडमधील माणगावमध्ये भीषण अपघात झाला. एसटी बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. रायगड येथे आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसटी बसमधून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.

एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात ही घटना घडली. या अपघातामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगाव येथे जाताना हा अपघात झाला.

 

रानवडे कोंड येथून २९ महिला माणगाव येथे कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.