लाडक्या बहिणींची शिलाई मशीन,घरघंटी गायब; यादीत नाव असून सुद्धा वितरणाला अचानक ब्रेक..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. ०८, कल्याण (ठाणे ) : महिलांना घरबसल्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन आणि घरघंटी वितरण करण्यात येत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकी आधी झपाट्याने वितरण झालेले साहित्य आचारसंहिता कलखंडानंतर कल्याण डोंबिवलीत वितरणाला ब्रेक लागला आहे. अचानक यादीत नाव असून सुद्धा साहित्य दिल जात नसल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मोफत शिलाई मशीन योजनेचा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कल्याण डोंबिवलीतील महिलांची यादीत नाव येऊन सुद्धा त्यांना वितरण केलं जातं नसल्याने महिला नाराज झाल्या आहेत. देशातील गरीब कुटुंबातील सर्व कामगार आणि महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि योजना सुरू केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकी आधी गती मिळालेल्या या वितरणाला निकालानंतर काही ठिकाणी ब्रेक लागला आहे. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या सामग्री रोखून धरल्या असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे या सुरू असलेल्या कारभारावरून महिला वर्ग प्रचंड संतापले आहेत.यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन महिलांना तातडीने साहित्य वितरण करण्याची मागणी केली आहे.

” कल्याण डोंबिवली मधील महिलांना यादी प्रमाणे वितरण सुरू केलं आहे. डोंबिवली, दिवा ग्रामीण भागात वितरण झालेलं नाही.मात्र ते तातडीने काल पासून सुरू करण्यात आले आहे.”

– वैभव भुवड, सामग्री वितरण अधिकारी