श्रीवर्धन येथे ना,आदिती तटकरे च्या हस्ते स्वच्छता सामग्रीचे लोकार्पण..   

Share news

प्रतिनिधी : संदीप द्रौपदी तुकाराम लाड                महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग मुंबई व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी ) च्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन नगरपरिषदेला एक घंटागाडी, एक ट्रॅक्टर व जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पामटेक एन्व्हायरी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चे बीच क्लिनिंग मशीन चे श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती लोकार्पण करण्यात आले. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किनाऱ्याची स्वच्छता अत्यावश्यक आहे .

समुद्र किनाऱ्यावरील दगड त्यासोबत अनावश्यक घटक यांची जलद गतीने साफसफाई करण्यात ब्लिच क्लीनिंग मशीन उपयुक्त ठरणार आहे. दोन ते पाच टन कचरा प्रति तासाला जमा करण्याचे सदर मशीनची क्षमता आहे.

 

सदरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रांताधिकारी महेश पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे , तहसीलदार महेंद्र वाकलेकर , गटविकास अधिकारी गजानन लेंडी पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे,व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.