पंचगंगा सिडस च्या कापसाला बोंड न लागल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्याची पाळी..

Share news

सिंदखेडराजा/ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा : तालुक्यातील वाघजाई येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू बाळाजी सानप यांनी आपल्या शेतात नगदी पीक कापूस लागवडीसाठी पंचगंगा सिडस कंपनीचे पोलारीस जातीचे एक बॅग बियाणे गट नंबर 191 वर लागवड केली मात्र या जातीच्या कपाशीला अद्याप एकही बोंडे न लागल्याने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी हा शेतकरी वारंवार कंपनी प्रतिनिधी च्या संपर्कात असून सदर कंपनी प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली मात्र अद्याप या शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याने पंचगंगा सिडस कंपनीच्या विरोधात कृषी विभागात तक्रार दाखल केली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की विष्णू बाळाजी सानप यांनी देऊळगाव राजा येथील मल्लावत कृषी केंद्रातून पंचगंगा सिडस कंपनीची पोलारस जातीचे एक बॅग बियाणे खरेदी करून आपल्या शेतात शेलगाव राऊत शिवारात गट नंबर 191 मध्ये या जातीचे बियाणे 11 जून 2024 रोजी लागवड केली मात्र या कपाशीला 45 ते 50 दिवसांत एकही बोंड लागले नसल्याने मल्लावत कृषी दुकादाराशी संपर्क केला असता सदर दुकानदारांनी संपर्क साधावा असे सांगितले यावेळी विष्णू सानप यांनी देऊळगाव राजा येथील पंचगंगा सिडस आॅफीस मधील वाघ साहेब यांना भेटून आपल्या कपाशी बियाणे बाबत तक्रार केली असता सदर वाघ साहेब यांनी ही माहिती वरीष्ठ अधिकारी यांना दिली यानुसार वरीष्ठ मार्केटीग अधिकारी श्री गेडाम साहेब यांनी प्रत्यक्ष शेतकरी यांच्या शेतात पाहणी केली असता अद्याप या कपाशीला एकही बोंड न लागल्याने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे स्पष्ट करून या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान साठी पंचनामा करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना पाठविण्यात आला.

मात्र अद्याप मोबदला मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींनी फोन करून मोबदल्याची मागणी केली असता कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहे त्यामुळे कंटाळून शेतकरी विष्णू सानप यांनी पंचायत समिती चे कृषी अधिकारी यांच्याकडे 7 आकटोबर रोजी तक्रार दाखल केली असून मोबदला देण्याची मागणी केली आहे सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री साहेब, कृषी मंत्री मुंबई, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांना दिल्या आहेत.

Local News 247