तलाठी व मंडळ अधिकारी यांचे रजा आंदोलन स्थगित; अखेर विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या आंदोलनाला यश ,अन्यायकारक प्रस्थावित बदल्या रद्द..

Share news

सिंदखेडराजा मातृतिर्थ/ ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराज :- बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तलाठी यांच्या प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक बदल्या रद्द करण्यासाठी व इतर प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संग नागपुर जिल्हा बुलढाणा यांनी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वामध्ये दि १८ जुलैपासून आंदोलन सुरू केले होते,त्यानंतर 29 जुलै रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सामूहिक रजा आंदोलन करून रजेवर गेले,त्यानंतर शेतकरी विद्यार्थी यांना तलाठी व मंडळ अधिकारी हे रजेवर गेल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला,त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने कुठलाही सकारात्मक तोडगा न काढल्यामुळे विदर्भ अध्यक्ष नागपूर बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा सुद्धा दिला होता अखेर ११ दिवसाच्या रजा आंदोलनानंतर दि ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी निर्भय जैन अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार,उपविभागीय अधिकारी शरद पाटील बुलढाणा,यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यासोबत आंदोलन मांगे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली,सदर झालेल्या चर्चेमध्ये प्रस्तावित अन्यायकारक बदल्यांचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्या बाबत जाहीर करण्यात आले ,नियतकालित बदल्या करता समुपदेशन घेण्यात आले,त्याबाबत आश्वासित करण्यात आले,आपसी बदल्या नियमानुसार करण्याचे आश्वासन देण्यात आले,आंदोलन काळातील सामूहिक रजा ह्या अर्जित रजत परावर्तित करण्याचे मान्य करण्यात आले,नवीन तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्याचे मान्य करण्यात आले,तसेच आंदोलन काळामध्ये गौण खनिज बाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासित करण्यात आले,

अशा सकारात्मक चर्चा झाल्यामुळे विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा बुलढाणा शाखा यांच्यावतीने तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले,सदर जिल्हा प्रशासनासोबत चर्चेच्या वेळी जिल्हा पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे,विदर्भ मंडळ अधिकारी केंद्रीय अध्यक्ष विजय टाकळे,मंडळ अधिकारी संघाचे सहसचिव प्रेमानंद वानखेडे,मंडळ अधिकारी संघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सातपुते,अशोक शेळके जिल्हा सचिव मंडळ अधिकारी संघ,विनोद भिसे विपसं जि उपाध्यक्ष,शिवानंद वाकतकर जिल्हा सचिव,संजय डुकरे संतोष राठोड यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .