मुरबाड तालुक्यात “शिवसेना भगवा सप्ताह “उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सदस्य नोंदणीस उत्सुर्फ पाठिंबा!

Share news

मुरबाड दि. 9(सुभाष जाधव ) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दि. 4ऑगस्ट ते 11ऑगस्ट 2024 रोजी “भगव्या सप्ताहाचे “आयोजन केले असुन, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, तसेच जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर अप्पा घुडे, यांच्या नेतृर्वाखाली, तालुका प्रमुख संतोष विशे यांच्या मार्गदर्शनाखाली “भगव्या सप्ताह “मुरबाड तालुक्यात आयोजन करण्यात येत आहे.

हे निष्ठावंत शिवसैनिक गावागावात जाऊन, शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी करीत आहेत व “भगव्या सप्ताह” निमित्त उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे.

उपतालुका प्रमुख बाळा चौधरी, रमेश कुर्ले, अजित ईसामे, लडकू चौधरी, संघटक चिंतामण गायकर, सीताराम हरड, विभाग प्रमुख,विठ्ठल बांगर,विठ्ठल पवार, शिवदूत रवी लाटे, दत्तात्रेय मोरे, अविनाश पवार, विभाग प्रमुख महेश सासे, योगेश घरत, जेष्ठ कार्यकर्ते भगवान शिंगोले, नारायण सूर्यरावं, युवासेना पदाधिकारी योगेश भोईर, प्रतीक घोळप, देवा बांगर, खंडू शिंगोले रुपेश घरत, नाना देवमुंडे, चेतन भोंडविले, राजेश मुकणे, केतन विशे, उद्देश चौधरी, सुजित हरड आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये अनेक गावामध्ये या सदस्य नोंदणी स चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247