जव्हार मधील आठ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित ..

Share news

जव्हार : सुनिल जाबर

शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक सोहळा नुकताच घाची हॉल येथे संपन्न झाला.

जव्हार सारख्या दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन यावर्षी ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक सोहळा संपन्न झाला.आदर्श शिक्षक सोहळ्याचे सत्कारमूर्ती म्हणून जव्हार तालुक्यातून विष्णू पिलाना जिल्हा परिषद शाळा कुंभारकांड,यशवंत गावित जिल्हा परिषद शाळा विनवळ, प्रवीण गावित जिल्हा परिषद शाळा मोकाशीपाडा,अरुण राजकवर जिल्हा परिषद शाळा पिंपळशेत, नेहा खाडे जिल्हा परिषद शाळा मेढा, जयराम दोडके जिल्हा परिषद शाळा धोंडपाडा, सुवर्णा भोर जिल्हा परिषद शाळा कळमविहिरा, संतू कांबळे जिल्हा परिषद शाळा खोरीपाडा, अशा एकूण आठ शिक्षकांना व दर्शना मुकणे जिल्हा परिषद शाळा काळीधोड यांचा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी पुरस्कार सोहळा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सुनिलजी भुसारा आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ यांनी बालपणीतील शाळेतील आठवणींना उजाळा देऊन सर्व शिक्षकांना उपयुक्त व मौलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाशजी निकम अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर (राज्यमंत्री दर्जा) यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थित सर्व शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती विजयाताई लहारे,उपसभापती दिलीप पाडवी, सदस्य चंद्रकांत रंधा,जि. प. सदस्या सुरेखा थेतले, रियाजभाई मणियार माजी नगराध्यक्ष ,दत्तात्रय चित्ते गटविकास अधिकारी ,पुंडलिक चौधरी गटशिक्षणाधिकारी ,संदीप माळी सरपंच कोरतड इतर मान्यवरांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करून तालुकास्तररिय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि बुधर यांनी केले.

Local News 247