प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी राज्य सरकार उदासीन – साठे युवा मंच..

Share news

मुंबई :- गेली 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हिंदू मातंग समाजाच्या विविध सामाजिक विधायक असलेल्या मागण्या निकाली काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये असलेले राज्य सरकार हे मागण्या पूर्ण करण्यासाठी उदासीन असल्याचे चित्रदिसत असून मातंग समाजाच्या मागण्या आचारसंहिते पूर्वी तातडीने मंजूर करण्याची मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली असून. निवेदनात म्हटले आहे की भारत देशाचा सर्वोच्च असलेला भारतरत्न पुरस्कार हा उपेक्षित साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठराव केंद्रास पाठवावा, तसेच 1 ऑगस्ट 24 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलेला असून त्या अनुषंगाने राज्य शासनाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट या जयंतीदिनी राज्य शासनाने शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, या विधायक मागणीसाठी राज्यभर विविध सामाजिक संघटनामार्फत समाज बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने विविध लक्षवेधी आंदोलने चालू असून राज्य शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असून राज्यात लवकरच आदर्श आचारसंहिता लागणार असून राज्य शासनाने अपेक्षित मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या विधायक मागणीकडे दुर्लक्ष न करता या तातडीने अध्यादेश मंजूर करण्याची मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने करण्यात येत असून राज्य शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मातंग समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उदासीनता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे राज्य शासनाने तातडीने पावले उचलून या प्रमुख मागण्या निकाली काढण्यात यावे .

राज्य शासनाने मातंग समाजाचे अमूल्य मतदान हे आपल्या लाच होईल या भ्रमा मध्ये न राहता आमची मते गृहीत न धरता तातडीने विशेष लक्ष देवून फेर विचार करून या मागण्या निकाली काढाव्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करता येईल अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ सचिन साबळे, पंडित आव्हाड, प्रा अनिल साबळे, रमेश सोळशे, संतोष थोरात,गजानन आव्हाड, प्रकाश मिसाळ, सचिन आव्हाड, प्रशांत साबळे, ओमकार आव्हाड, रवी साबळे , विजय आव्हाड,बापु आव्हाड, संदीप साबळे, अनिल आव्हाड, नितीन कांबळे, गजानन साबळे, विनोद मानकर, शुभम आव्हाड, विकास कांबळे, विशाल मिसाळ, सचिन आव्हाड,महीला आघाडी अध्यक्ष अंजली साबळे, राध्या यांगड, स्नेहल साबळे, शिल्पा आव्हाड, कमालबाई आव्हाड, संगीता आव्हाड , प्रीती साबळे, संगीता कांबळे, श्रुती साबळे, प्रियंका गायकवाड , सुबद्रा कांबळे आदी नी राज्य शासना कडे मागणी केली आहे.