लोकनेते पंकजाताई साहेब मुंडे यांच्या ऐतिहासिक दसरा मेळावास उपस्थित रहा; अँड सचिन श्रीमंत आंधळे यांनी केले आव्हान..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

शक्ती आणि भक्तीचा संगम असलेल्या भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील ऐतिहासिक मेळाव्यास हजाराच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान भाजपाचे युवा नेते अँड सचिन श्रीमंतराव आंधळे यांनी केले आहे ताईंचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे शिवसेनेचा मुंबई शिवाजी पार्क येथे तर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ऐतिहासिक दसरा मेळावा होतो या तिन्ही दसऱ्या मेळावा कडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले असते.

संत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्यात भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे काय बोलतात याची उत्सुकता असते यावर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळावा मागील गर्दीचे सर्व विक्रमी रेकॉर्ड मोडत ठरणार आहे या ऐतिहासिक दसरा मेळावा चे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाने दसऱ्यामध्ये हजर राहावे असे आव्हान सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे युवा नेते अँड सचिन श्रीमंतराव आंधळे यांनी केले आहे आणि हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने आपण सावरगाव घाट येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे