सिप्ला कंपनीत भारतीय मजदूर संघाने केला वेतनवाठीचा करार.

Share news

खालपूर (चेतन पोवळे): खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीच्या कारखान्यात काम करणाय्या कामगारांच्या वेतन वाढीचा करार भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ आणि सिप्ला कंपनी यांच्यात नुकताच संपन्न झाला. या कराराद्धारे कामगारांना रुपये 5800/- एवढी वाढ दरमहा मिव्ठणार आहे. यापैकी 50 टकके रक्कम ही मूठ वेतन आणि अन्य रक्कम विविध भत्त्यांमध्ये दिली जाईल. कराराचा कालावधी एप्रिल 2023 पासून तीन वर्षाचा राहील.

कंपनीच्या वतीने एचआर हेड अनिरुद्ध कुंटे, प्लांट हेड पराग देशमुख, एचआर मेंनेजर विनायक काठे, श्री वेदराज यासह युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी अँड. अनिल ढुमणे, अशोक निकम, दामोदर जोशी, महादेव कचरे, बागडे पाटील, संजय लाड, गणेश आंबवणे, रवींद्र वछंजू, अनिल जाधव यांनी करारावर सह्या केल्या. यावेव्ठी भारतीय मजदुर संघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते. सदरचा करार हा विक्रमी वेठेत म्हणजे केवव्ठ चार महिन्यात संपन्न झाला. त्याबददल संघटनेच्यावतीने व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले. या करारामुळे कामगारांचे वेतन ६२ हजारच्या पुढे जाणार आहे. करार झाल्यानंतर कारखान्यातील सर्व कामगारांनी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला. पेढे वाटून कारखाना गेटवर अन्य कारखान्यातील कामगारांसह आनंद उत्सव साजरा केला.