जव्हार : सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील काही अंतरावर असलेली न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महालेपाडा चालतवड येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी या कॉलेजची शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ ची पालक सभा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाला सरस्वती प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली व जण उत्कर्ष प्रबोधिनी उधवा संचलित श्री पंकज डायाभाई भंडारी संस्थेचे संस्थापक माननीय श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी तुम्ही शिक्षकांवर जबाबदारी दिली तर त्यांचेकडून शक्य होणार नाही त्यामध्ये पालकांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते म्हणून पालक ,विद्यार्थी, व शिक्षक या सर्वांनी एकत्रित मिळून किंवा जास्तीत जास्त संवाद करून ,जीवनात विद्यार्थी चांगले कसे घडतील या कडे सर्व पालकांनी लक्षकेंदित करावे. असे थेट पालकांसमोर आव्हान करण्यात आले.
या प्रसंगी या महाविद्यालयाचे सदस्य भोये सर तसेच न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.अश्विनी सपकाळे मॅडम,तसेच प्राध्यापक विकास भोये सर, जाबर सर व गवळी मॅडम माजी सरपंच निर्मला भोये मॅडम व पालक तसेच या कॉलेज चे सर्व विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.