महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्ता देशमुख याज कडून
टेंभुर्णी ता जाफ्राबाद जि जालना येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर होणा-या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, विजयी घोडदौड व क्रीडा स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. जाफ्राबाद येथे “तालुका क्रीडा अधिकारी जाफ्राबाद” यांच्या वतीने”तालुका स्तरावरील “शालेय क्रीडा स्पर्धा” -२०२३-२४चे आयोजन मोठ्या उत्साहात होत आहे.नुकत्याच झालेल्या मैदानी स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत- वयोगट १९ वर्षा खालील- राहुल सुरेश कावळे, या खेळाडुने प्रथम क्रमांक पटकावला, तर ८००-मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. उंच उडी स्पर्धेत- ऋषिकेश संजय नवले यांने प्रथम क्रमांक पटकावला असुन, भालाफेक क्रीडा स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत- विशाल भगवान शेळके याने, द्वितीय क्रमांक पटकावला आहे. “तिहेरी उडी” व “थाळी फेक” क्रीडा प्रकारात ओमराज कृष्णा उखर्डे याने “प्रथम क्रमांक” पटकावला असुन, गोळा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. फैजान मुजीब शेख या क्रीडा पटुने “लांब उडी” स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अक्षय नवले याने “हॅमर थ्रो” क्रीडा प्रकारात-द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ४×१०० मीटर “रिले स्पर्धेत” १९वर्ष वयोगटातील -ओमराज उखर्डे,अक्षय नवले, ऋषिकेश नवले, राहुल कावळे, सय्यद मुख्तार मुश्ताक यांनी “प्रथम क्रमांक” पटकावला आहे. या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच वयोगट १७ वर्षे यात- गौरव शिवहरी खरात, यांने- गोळा फेक क्रीडा स्पर्धांमध्ये- “प्रथम क्रमांक” पटकावला आहे. ‘भालाफेक’ क्रीडा स्पर्धांमध्ये-ओम शांताराम पवार, याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. उंच उडी स्पर्धेत-ओम ज्ञानेश्वर व्यवहारे, याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुदर्शन भोरे या क्रीडा पटुन- “लांब उडी” स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे, तसेच -धिरज नंदु शेजुळ याने -तिहेरी उडी स्पर्धेत- प्रथम क्रमांक,व ११० मीटर अडथळा धावण्याच्या स्पर्धेत-द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ४×१००मीटर रिले स्पर्धेत-सूदर्शन भोरे, धिरज शेजुळ,ओम पवार,ओम व्यवहारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. वयोगट १४ वर्षाखालील-कुणाला जितेंद्र छडिदार, याने २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत,द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे, या सर्व विजयी विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिक्षक -राजेश शेवाळे, कैलास भुतेकर यांचे मार्गदर्शन लाभले असुन, या सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांचे नवभारत शिक्षण संस्थेचे-अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष शेख जमिर सर,सचिव- सत्यनारायण सोनी, कोषाध्यक्ष सुभाष राठी,ज्येष्ठ संचालक रामनारायण काबरा, माजी अध्यक्ष तथा संचालक सुरेश शेठ काबरा, माजी सचिव तथा संचालक प्रेम सुख काबरा, माजी सचिव तथा संचालक प्रल्हाद टेंभुर्णीकर, जेष्ठ संचालक- मधुकर निकम, , संचालक राजीव काबरा , संचालक दीपक काबरा,संचालक विष्णूभाऊ सांगुळे, संचालक प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख ., संचालक प्रदीप मुळे,प्रदीप काबरा, प्राचार्य. भास्कर चेके, उपप्राचार्य.मधुकर झटे, उपमुख्याध्यापक. नंदकुमार काळे, पर्यवेक्षक.पंजाबराव सोळंके, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख- एस.बी. बोरकर, संजय कुलकर्णी, माजी उपसभापती तथा शिक्षक दिनकरराव उखार्डे,गणेश सावसक्के, धनंजय पुराणे, रमेश इंगळे, विष्णू जाधव, संजय व्ही कुलकर्णी,भिवसन ससाणे, समाधान कांबळे, दत्ता उखर्डे,प्रा.सुनिल बनसोडे डॉक्टर आनंद जाधव , ,राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे,प,प्रा.गजानन धोटे, वासुदेव क्षिरसागर समाधान कांबळे, उज्ज्वला आवटी, माधुरी पाटील, फिरदौस शेख, मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, विजया शिल्लार, राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख,दगडूबा तांबेकर, दिपक देशमुख, या सर्वांनी अभिनंदन केले आहे.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.