आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा धडाका; कोकणातील शाळांमध्ये आनंदाचे वातावरण..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.०५, डोंबिवली ( ठाणे ): मागील वर्षी ११३६ व यावर्षी ९६० शाळांना १० कोटी रुपयाचे साहित्य टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार वाटप होत आहे.

आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत डिजिटल ई-लर्निंग इक्विपमेंट (शैक्षणिक साहित्य) नवी मुंबई आणि डोंबिवली विभागातील ६१ शाळांना वाटप करण्यात आले,

आज दिनांक ०४ सप्टेंबर.२०२४ रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास (२०२४-२५) निधीतून नवी मुंबईतील व डोंबिवली विभागातील एकूण ६१ शाळांना डिजिटल इ-लर्निंग इक्विपमेंट चे वाटप करण्यात आले.

नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विभागातील एकूण ३१ शाळांचे वाटप करण्याकरिता विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील साहेब शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय देविदास म्हात्रे साहेब, मा. सुमित म्हात्रे साहेब, उमेश कोलते सर, नेहा गवळी मॅडम, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे भास्कर देशमुख सर, विकास वाघमारे सर,लचाने सर,कुरपडे सर, सोमवंशी सर, कापरीकर सर, एन आय आय टी च्या गोडसे मॅडम आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

डोंबिवली पूर्व पश्चिम आणि ग्रामीण या विभागातील एकूण ३० शाळांचे डिजिटल ई लर्निंग वाटप करण्यात आले, याप्रसंगी पडले ग्राम विकास संस्थेचे सहसचिव मा. बाळाराम पाटील साहेब, चारूमामा विद्यालयाचे संचालक मा.अरुण म्हात्रे साहेब, मुख्याध्यापक रायसिंग सर, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष वसंत जोहरे सर, अमित ढेपे सर, परदेशी सर, अरविंद तिवारी सर, प्रभू कोतली सर, लीना ठाकूर मॅडम, पिंगाळकर सरआणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247