दिव्यात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरु: पोस्ट ऑफिस च्या सर्व सुविधा आता दिवेकरांना मिळणार, विजय भोईर यांच्या पाठपुरावाला यश.. 

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. ०४, दिवा (ठाणे ): नुकताच दिवा शहरामध्ये स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. ठाणे पोस्ट ऑफिसचे अधीक्षक मा. समीर महाजन, मा.एस.बी. व्यवहारे, मा. डेप्युटी सिनियर पद्मजा कामत , मा. असिस्टन्ट सुप्रिडेंट अमिता सिंग विकास पाटील विकास अधिकारी आणि आता तरी जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय अनंत भोईर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वतंत्र दिवा पोस्ट ऑफिसचे उदघाटन करण्यात आले.

मुंब्रा पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत दिवा येथे मोजक्या सेवा देणारे आऊट पोस्ट सुरु होते. परंतु काही पोस्टाशी निगडित मुख्य कामांसाठी लोकांना डोंबिवली,मुंब्रा, ठाणे येथे जावे लागत असे आणि सध्या दिव्याची लोकसंख्या ६ लाखाच्या घरात असताना दिवा आऊट पोस्ट ऑफिस वर प्रचंड ताण येत होता. नागरिकांची हि होणारी गैरसोय लक्षात घेता विजय अनंत भोईर यांच्या अनेक महिन्यापासून पाठपुरावा करून स्वतंत्र पोस्ट ऑफिस च्या मागणीला अखेर पूर्णविराम मिळाला.पोस्ट विभागाने दिव्यासाठी स्वतंत्र पूर्ण वेळ पोस्ट ऑफिस दिनांक २ ऑगस्ट २०२४ पासून सुरु केले आहे. त्यामध्ये पोस्टाच्या आणि सरकारी सेवा देण्यात येतील. तसेच नियमित आधार कार्ड शी निगडित सर्व सेवा सुरु राहतील.याचा लाभ दिव्यातील सामान्य नागरिकांना घेता येईल.

या कार्यक्रमासाठी सपना भगत, कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघटनेचे प्रकाश पाटील सांगली जिल्हा रहिवाशी संघटनेचे अशोक पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर मंचाचे बालाजी कदम,रीना सिंह, पूनम सिंह, आर पी एफ रिटायर इन्स्पेक्टर रामअवघ यादव,शमशेर यादव गयादिन यादव, मनोज यादव, पूनम तिवारी, नीता पवार अवधराज राजभर या सर्वांची उपस्थिती होती.

Local News 247 Local News 247