ग्रामपंचायत कासटवाडी सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी हा उपक्रम राबविला.

Share news

जव्हार : दिनेश आंबेकर

जव्हार : ग्रामपंचायत कासटवाडी सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी हा उपक्रमाला सुरुवात झाली असून पालघर जिल्हातील पहिला उपक्रम हा स्वखर्चातून राबविला जात आहे.शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत,जिल्हा परिषद सदस्य,गुलाब विनायक राऊत व

लोकनियुक्त सरपंच,कल्पेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतुन आपल्या ग्रामपंचायत कासटवाडी मधील सर्व गावापाडयातील घरांचा सर्व्हे होणार असून आपल्या ग्रामस्थांच्या विकासकामा बद्दल अडचणी योजनांचा लाभ पि.एम.जनमन अंतर्गत लाभार्थी निवड आधारकार्ड, जातीचा दाखला,मतदान कार्ड, घरकूल,रेशनकार्ड,जॉबकार्ड, वनपटट्टा धारक,अपंग,निराधर, विधवा,परिपक्वता शासनाच्या विविध प्रकाराच्या योजना जेणे करुन आपल्या ग्रामस्थांनी सर्वानी अपेक्षित कागदपत्रे व शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात येतील.या उद्‌देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण,कल्याणकारी योजना

सर्व समान्यांच्या दारी!युवा रोजगार प्रशिक्षण योजना,मुलींसाठी लेक लाडकी योजना,वयोश्री योजना,तीर्थक्षेत्र दर्शन योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,आनंद दिघे दिव्यांग योजना.अशा सर्वच योजने पासून कोणी वंचित राहू नये अथवा एखादा गरीब आणि गरजूंना त्यांचा मोफत लाभ मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवून घेतला जात आहे या प्रसंगी कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी, ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे,उपसरपंच त्रिंबक रावते,ग्राम सदस्य,शंकर इल्हात,नितीन टोकरे, कुणाल सापटा,नितीन चौधरी,अशोक इंधन,कल्याणी राऊत,सुलोचना चौधरी,राजश्री टोकरे,चंदा पवार,मोनिका खिरारी,सुचिता होळकर,ग्राम कर्मचारी,प्रमोद खोटरा, किरण जांजर,ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थित होते.

Local News 247 Local News 247