आमची वसाहत आमची ताकत; महापालिका मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे साहेबांना नागरी कृती समितीच्या वतीने ठराव /मागणी पत्र देण्यात आले..

Share news

आज दिनांक 3 आक्टोबर 2024 रोजी मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांची औ वसाहत इंदिरानगर समस्त झोपडिधारक नागरिक हक्क समितीच्या वतीने भेट घेतली पुनर्वसनात येणाऱ्या त्रुटी, अडचणी, मुद्दे, नागरी प्रश्न यावर तोडगा व मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या एकमताने मान्य केलेला ठराव व मागण्यांचे लेखी निवेदन दिले त्या वर अभियंता साहेबांनी प्रत्येक ठराव /मागण्या यावर समितीतील उपस्थित सभासद यांच्याशी चर्चा केली ठरावात नमूद मुद्द्याचा विचार करू पुनर्वसनातील अडचणी त्रुटी दूर करून सर्व झोपडी धारक नागरिक यांना विश्वासात घेऊनच पुनर्वसन प्रकल्प करू या मध्ये विशस्वास घात होणार नाही नागरिकांना कोणतीही ही जबरदस्ती न करता त्रास न देता सर्वांच्या सहकार्याने पाठिंब्याने प्रकल्प राबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले पुनर्वसन प्रकल्प चांगला टिकाऊ दर्जात्मक भविष्याचा विचार करणारा नागरी जीवनमान उंचावणारा चांगल्या सुविधा युक्त असेल तर नागरिकांच्या वतीने आपणास सहकार्य पाठिंबा असेल असे औ वसाहत इंदिरा नगर समस्त झोपडीधारक नागरिक कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन सांगण्यात आले यावेळी सर्व सभासद उपस्थित होते.

Local News 247