नेरपिंगळाई येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर संपन्न..

Share news

मोर्शी प्रतिनिधी:- मा.सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय,अमरावती यांचे विद्यमानाने, धर्मदाय आयुक्त इंगोले ,आयुक्त पाठक मॅडम तसेच अँड. पारडशिंगे , इन्स्पेक्टर जावेद पठाण यांचे वतीने तसेच आयोजक..श्री समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थान, नेरपिंगळाई येथे मोफत रोग निदान शिबीर दिनांक.

4/09/2024 रोजी संपन्न झाले.या शिबिरात 125 लोकांची मोफत तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमात गुलाब पुरी महाराज संस्थानचे अध्यक्ष विजय कपिले,सचिव अरुण देशमुख,उपाध्यक्ष अरुण सभे,विश्वस्त रामदास आकोलकर,देविदास खोडे,भास्कर अडणे तसेच पिंगळा देवी संस्थेचे अध्यक्ष विनित पाखोडे,सचिव आशिष मारुडकर, सह सचिव पद्माकर पाखोडे उपाध्यक्ष मोहन देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Local News 247