जिल्हा प्रतिनिधी :- प्रफुल साठे
अकोला : दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती अकोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष श्री गणेश भाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही भव्य दिव्य रॅली ची सुरुवात सिटी कोतवाली चौक ते रेल्वे स्टेशन अण्णाभाऊ साठे चौक पर्यंत निघाली असून ,
सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अकोला जिल्ह्याचे सिटी कोतवाली ठाणेदार श्री दुधगावकर साहेब तसेच समितीचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ सपकाळ तसेच
आदरणीय सुजात आंबेडकर यांनी प्रथमच येऊन या रॅलीची शोभा वाढवून वंदन केले.
या रॅलीला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते संजय सपकाळ सोनू इंदूरकर विशाल झाडे करण वाघमारे संतोष सपकाळ गोकुळ मानकर गजानन दांडगे नागेश गवई नंदनी आढाव बेबाबाई इंदुरकर आशा गवई उषा लोखंडे तसेच सर्व समाज बांधवांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन जयंती ही मोठ्या हर्ष उल्हासात बँड वाजासह डीजेच्या सुरात साजरी झाली .
श्री ठाणेदार वायदंडे साहेब सिटी कोतवाली अकोला यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या रॅलीमध्ये अफाट समाज बांधव समुदाय यांनी उपस्थिती दर्शवून जयंतीची शोभा वाढवली
संबंधित छायाचित्रे: