बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली ची १००% निकाल लावत SSC परिक्षेत बाजी.

Share news

कणकवली येथील अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली चा शालांत परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असून कु. श्रावणी राजेंद्र मराठे हिने 97.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी यशिका कल्पेश म्हाडेश्वर हिने 95.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कु. पायल शरद बांदेकर हिने 94.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कु. संहिता पुरुषोत्तम अंधारी हिला 94.60% तर कु. श्रावणी प्रशांत दळवी हिला 94% गुण प्राप्त झाले आहेत.

2022-2023 या वर्षी बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे एकूण 27 विदयार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ट झाले होते. 20 विद्यार्थ्यांना 70% च्या वर गुण प्राप्त झाले आहेत. तर 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत व शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% टक्के लागलेला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संचालिका सौ. सुलेखा राणे, खजिनदार श्री.रमेश राणे, सदस्य श्री. संदीप सावंत, श्री. विनायक सापळे, शैक्षणिक उत्कृष्टता समन्वयक सौ. प्रणाली सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी, सर्व शिक्षक, पालकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment