दिन दुबळ्यांचे कैवारी समाजसेवक भास्करशेठ वडवले यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन !

Share news

ठाणे मुरबाड- (शंकर करडे)
मुरबाड तालुक्यातील गणेशपुर गावचे भुमिपूञ तथा आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्तीय भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भास्करशेठ वडवले यांचा 3 जून रोजी वाढदिवस असतो. समाजाचे आपल्यावर काहितरी रुण आहेत ते आपण फेडले पाहिजेत हा उद्दात हेतू समोर ठेवून सतत गावाच्या विकासासाठी धडपडणारे भास्कर वडवले काही वेगळेच व्यक्तीमत्व पाहायला मिळते. गावची पाण्याची तहान शासनाकडून भागवली जात नाही हे लक्षात येताच स्वखर्चाने मिल्हे – गणेशपुरसाठी पाणी उपलब्ध करुन दिले.

गावाचा खर्या अर्थाने विकास साधायचा असेल गरिब , सोशित , आदिवासी , शेतकरी यांना न्याय द्यायचा असेल तर गावचा कारभार आपल्या विश्वासू माणसाकडे यायला पाहिजे म्हणून मागिल वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कथोरेंच्या मार्गदर्शनाखाली स्वःताचा पॕनल उभा करुन तो जिंकून देखिल आणला. “जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपले” या उंक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्यांना सदैव मदतिचा हात देणारा हा भास्कर म्हणजे सर्वाना प्रकाश देणारा सूर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. तालुक्यात व तालुक्याबाहेर लोकांशी त्यांचे किती प्रेमाचे व सलोख्याचे संबंध त्यांचे आहेत हे त्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सध्या मुरबाड – शहापुर कुणबी रहिवासी मंडळाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. सदा हसतमुख चेहरा कोणताही बडेजाव नाही माणसात देव शोधणार्या या दानशुर व्यक्तीमत्वाला वाढदिवस प्रित्यर्थ अभिष्टचिंतन

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment