मुरबाड तालुक्यातील “तुलई ” प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे केले बोगस काम, नवीन टाकी ऐवजी बसविली जुनीच पाण्याची टाकी.

Share news

मुरबाड तालुक्यातील “तुलई ” प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे केले बोगस काम!
जिल्हा परिषद ठाणे दुरिस्ती च्या कामात नवीन टाकी ऐवजी बसविली जुनीच पाण्याची टाकी!
ज्याच्या हाती सत्ता ,तो नाचे भलतुसा.या म्हणीप्रमाणे मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेले गाव म्हाणून या गावाची अनोळखी ओळख आहे ,प्राथमिक आरोग्य केंद्र तुलई हे होण्यामागे फार मोठे योगदान ,तुलई गावचे दानशूर वेक्तिमत्व म्हणजे सुरेश भाऊ चौधरी यांनी विनामूल्य आपली दोन एकर जागा दिली त्याचा कोणताही मोबदला सरकार कडून घेतला नाही ,परंतु त्याची कदर तुलई गावकर्यांना नाही ,या ठिकाणी जिल्हा परिषद ठाणे येथून आरोग्य केंद्राची दुरिस्ती घेण्यात आली,त्या दुरिस्तीत थातूर मातुर चुना लावून काम करण्यात आले .

गेली दोन वर्ष्या पूर्वी सदरचे काम एका सोसायटीच्या मार्फत.एका ठेकेदाराने ८०००००( आठ लाख ) रुपयाच्या दुरिस्तीचे काम थुका पट्टी लावून रंग रंगोटी, तूट फुट ,व नवीन सिंटॅक्स ( पाण्याची टाकी) न बसविता जुनीच पाण्याची टाकी लावण्यात येऊन ,राष्ट्रीय पेयजलं योजनेचे पाणी आरोग्य केंद्रास येत आहे या योजनेचे पाणी टाकीत न पडता वाया जात आहे ,कारण टाकि फुटलेली असून त्यात पाणी साठत नाही ,अतिशय बोगस व चुकीच्या पद्धतीने तुलई आरोग्य केंद्राचे दुरिस्ती चे काम केले आहे ,सत्ता असल्याने काहीही करता येते ,हे सिद्ध होत आहे ,पंचायत समितीचे अधिकारी आपली टक्के वारी घेतली का लगेंच कामाचे बिल काढतात ,यास कारण सत्ता जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपलाच असल्याने कोण आपले वाकडे करते ,मग करा काहीपण सरकार आपलंच आहे ,तर आरोग्य केंद्रास पुरेसे पाणी मिळत नाही त्या मुळे येथे पाण्याचा तुटवडा भासत आहे या वर तुलई ग्रामपंचायतीचा अंकुश नाही ,तुलई ग्रामपंचायत म्हणजे आंधळं दलतंय,आणि कुत्रा पीठ खातय अशी अवस्था झाली आहे,या कामाची सखोल चौकशी व्हावी.व समंधित ठेकेदार व.काम पाहणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मुरबाड तालुका आर,पी,आय ,सचिव सुभाष जाधव यांनी केली आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment