बोरिवलीचा नॅन्सी कॉलनीतील रहिवाशांची पुनर्विकास प्रकरणी बिल्डर विरुद्ध फसवणुकीची तक्रार ..

Share news

नॅन्सी कॉलनीच्या पुनर्विकास प्रकरणी त्यांच्या बिल्डरने लोकांची कशी घोर फसवणूक केल्याची तक्रार रहिवाश्यांनी केली आहे. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.
याबाबतचे मोठाले फलक आज शांतीवन- नॅन्सी कॉलनी परिसरात लागले आहेत व लोकांना सावधान राहण्याचा इशारा करण्यात आला आहे व
सोसायटीचा पुनर्विकास करताना बिल्डर बरोबर अग्रीमेंट करताना विशेष काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

D.G.S. Township Pvt. Ltd. यांच्याकडून नॅन्सी कॉलनी बिल्डींग गृहनिर्माण संस्थेच्या २१६ सभासदांची घोर फसवणुक करण्यात आल्याचा आरोप सभासदांकडून होत आहे.

पूर्नविकास होण्याआधी प्रॉपर्टी कार्ड, विकासकाकडून Affidavit, BMC IOD यावरती मंजुर असलेले ५५९९ चौ. मीटर क्षेत्रफळ नमुद असतानाही सोसायटी कार्यकारी मंडळ व विकास (D.G.S. Township Pvt. Ltd.)

मिळून ४०० मीटर तोटा व नुकसान असे दाखवुन दि. १५.०७.२०२२ रोजी Supplementary Agreement सोसायटी सदस्यांना विश्वासात न घेता रजिस्टर केले गेले आहे, आणि SRA 33 (11) DCPR स्कीम सभासदांच्या माथी मारण्यात आलेली आहे असे सभासदांचे म्हणणं आहे.

सदर प्रकरणात सोसायटी कार्यकारी मंडळाकडून विकासकास वाढीव सुमारे १,१६,००० स्के. फुट जास्त मिळवण्याकरता व त्यातुन जास्त नफा (Profit) सकृतदर्शी मदत केल्याचे दिसत आहे.
यात गोरगरीब सोसायटी सभासदांची विकासक आणि सोसायटी कार्यकारी मंडळकळून दिशाभुल करून घोर फसवणुक केली गेलेली आहे असे तक्रारीत नमूद केलं आहे.

बाकी सर्व सोसायटिंनी विकासकाची नेमणूक करताना दक्षता घेण्याची विनंती या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment