मालवणच्या नांदोसमधील तुषार पवार यांचे युपीएससी परीक्षेत यश

Share news

मालवणच्या नांदोस चव्हाणवाडीतील तुषार पवारने (वय २४ वर्ष) युपीएससी भारतातून ८६१ रँक प्राप्त करुन यश संपादन केले आहे.

तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला आहे. त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. त्यामुळे तुषार यांचे १२ पर्यत शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर पुणे येथे पुढील शिक्षण पूर्ण करत तुषार हे यूपीएससी अभ्यास करत होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यानी यशाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुषारचे हे यश नक्कीच सिंधुदुर्ग जिल्यातील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment