पोलादपूर तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत दाखल

Share news

पोलादपूर तालुक्यात दि २८ रोजी भव्य पक्षप्रवेश समारंभ मोरे हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता, या पक्षप्रवेश कार्यक्रमात पोलादपूर वरचा मोहल्यातील मुस्लिम बांधव,देवळे, तुंर्भे खोंडा,वझरवाडी, तुंर्भे बु.लोहारे,चांभारगणी, कापडे बु.आदिवासी वाडी तसेच यांच्या समवेत तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मधील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादींनी शिवसेनेत पोलादपूर येथील मोरे हॉल या ठिकाणी घेतलेल्या भव्य पक्षप्रवेश समारंभात असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला,

या पक्षप्रवेश समारंभावेळी तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेश समारंभ वेळी पक्षातील काम करणाऱ्या शिवसैनिकांना विविध भागात संघटनेची जबाबदारी देत जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तसेच पक्ष बांधणीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले.
सिताराम कळंबे
पोलादपूर

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment