कणकवलीतील युवकांची कमाल अवघ्या ३५ हजारात बनवली इलेक्ट्रिक बाईक

Share news

कणकवलीतील युवक तुषार पवार आणि वैभव राणे यांनी अवघ्या ३५ हजारात फुल्ली फंक्शनल इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे. या बाईक मधे सर्व आधुनिक फिचर्स चा समावेश आहे.

विशेष म्हणजे या दोघांनीही वाणिज्य आणि कला शाखेत शिक्षण घेतल आहे. कोणताही अभियांत्रिकी अनुभव नसताना केवळ स्वतः शिकून वर्ष भरात त्यांनी ही बाईक बनवली. ही बाईक बनवत असताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला या साठीचे पार्ट त्यांना पाँडिचेरी, पुणे सारख्या शहरातून मागवावे लागले.

ही बाईक ३ तास चार्ज केल्यावर सुमारे ५० ते ५५ किलोमीटर चालू शकते. तसेच १५० किलो पर्यंत वजन वाहू शकते. तसेच ताशी ४५ किमी पर्यंत वेग गाठू शकते. याच बरोबर या बाईकला रिव्हर्स घेण्याचा ऑप्शनही आहे.

तुषारला लहानपणापासून वाहनाची आवड आहे. त्यांने अनेक छोट्या टॉय बाईक बनवल्या आहेत. तसेच अन्य टाकाऊ पासून दर्जेदार उपयोगी वस्तू तयार केल्या आहेत. त्या आपण खाली पाहू शकता.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment