शिवरायांचा इतिहास तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या तोंडपाठ. ‛इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद.

Share news

ज्या वयात मुले बोबडे बोलत असतात त्या वयात एका चिमुकल्याने शिवरायांचा इतिहास तोंडपाठ केला आहे..

अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व आणि पराक्रम संपूर्ण विश्वाला ज्ञात आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकावर इथली माती शिवशंभू चे संस्कार करते आणि त्याच्याच प्रत्यय आपल्या धाराशिव जिल्ह्यात बघायला मिळाला.

धाराशिव जिल्ह्यातील शिरढोण येथील तीन वर्षाचा छोटा मावळा जयवर्धन अमोल सिंह यादवला शिवरायांचा इतिहास तोंडपाठ असल्याने ‛इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने सन्मानित केल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.!
या वयात राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवणं हे खरंच कौतुकास्पद आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment