सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी 5 चा विजेता ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

Share news

संपत बनकर प्रतिनिधी बारामती:- बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे आज 70 दिवसांच्या या खेळाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

बिग बॉस मराठी 5 या पर्वाचा विजेता कोण होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र आज बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता मिळाला आहे तर बारामती तालुक्यातील मोढवे या गावातील सुरज चव्हाण हा स्पर्धक बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे यावेळी विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफीसह 14 लाख 60 हजार रुपयांचा धनादेश तसेच ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये व इलेक्ट्रिक स्कुटर बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

यावेळी टॉप 3 मध्ये अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि सुरज चव्हाण या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली आहे आणि अशातच टॉप 6 सदस्यांपैकी जान्हवी किल्लेकरने 9 लाख रुपये रोख रक्कम घेऊन हा खेळ स्वइच्छेने सोडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख यांनी उत्तम प्रकारे केल्यामुळे त्यांचेही प्रेक्षकांनी कौतुक केले