उद्धव कुमठेकर यांचा ‘लोकमत लोकनेता’ पुरस्काराने गौरव; कार्यसम्राट राजकीय चेहऱ्यांना प्रकाशझोतात आणणारा पुरस्कार..

Share news

प्रतिनिधी अंकुश महाराज कुमठेकर 

मुंबई – महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे पोलादपूरच्या पावन भूमीत जन्मलेल्या उद्धव प्रतापराव कुमठेकर यांचा ‘लोकनेता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत तरुणाईपर्यंत प्रेरणादायी संदेश पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल उद्धव यांना गौरविण्यात आले आहे.

उद्धव प्रतापराव कुमठेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिर्डी विधानसभा संपर्क प्रमुख असून, श्री संत मोरे माऊली महाराज वारकरी सांप्रदायाचे प्रचारक व प्रसारक आहेत. यापूर्वी त्यांनी बीड विधानसभेचे काम यशस्वीपणे सांभाळले होते. त्यांची कामगिरी पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर शिर्डी विधानसभेची भक्कम बांधणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील नरीमन पॅाईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या भव्य-दिव्य पुरस्कार सोहळ्यात ‘लोकनेता पुरस्कार’ वितरीत करण्यात आले.

या सोहळ्याला महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधीमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन सरदेसाई, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॅा. विजय दर्डा, ‘लोकमत’ मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उद्धव यांना अंबादास दानवे आणि विजय दर्डा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अंबादास दानवे यांनी उद्धव यांच्या कामाचे कौतुक केले. विजय दर्डा यांनी उद्धव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत प्रोत्साहन दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार वितरणानंतर खाजगीत बोलताना उद्धव यांचे मनापासून कौतुक करत पुरस्कार पटकावल्याबद्दल अभिनंदन केले. यासोबतच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व विठूमाऊलीच्या जयघोषाने करण्यात आली. यावेळी सुरेख नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पुरस्कार वितरणादरम्यान मंचावर उपस्थित दिग्गजांमध्ये राजकीय गप्पा रंगल्या.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247