बदलापूर बंद, मनसे एकटी वाघिणी ने प्रशासन आणि राजकीय नेत्यांना झोपेतून उठवले..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. २१ बदलापूर (ठाणे ): बदलापूर शहराच्या दोन लहान चिमुकल्यांना न्याय देण्यासाठी मनसेची रणरागिणी संगीता मोहन चेंदवणकर यांनी अनेक दिवसांपासून हा विषय लावून धरला होता. पण प्रशासन आणि मीडिया लक्ष देत नव्हती. नंतर स्थानिक मीडिया या मुद्द्यावर लक्ष देऊ लागली होती.

काल मनसे पक्षाने आणि संगिता ताईंनी पुढाकार घेऊन आंदोलनाची रूपरेषा आखली. बदलापूर शहरात आंदोलन सुरू करताच शहरातील, रिक्षा चालक संघटना, शहरातील व्यापारी संघटना, प्रवासी यांनी पाठिंबा दर्शवला आणि बदलापुरातील सर्व जनता रस्त्यावर उतरली आणि मग हे प्रकरण राज्यात पोहचलं.

मनसेच्या महिला नेत्या “संगीता चेंदवणकर ह्यांनी गेले दोन दिवस बदलापूर ढवळून काढलेय. १२ तास पोलिस स्थानकात ठिय्या, त्यानंतर गुन्हा दाखल , पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे ह्यांची बदली, आरोपीला अटक आणि आज बदलापूर बंद करून दाखवले.

सलाम तुझ्या कार्याला, लाडकी बहीण योजना नको. तर लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या, आधी मंदिर आता शाळा यानंतर घरात घुसणार का? एका दिवसात नोटबंदी होते. एका दिवसात सत्ता बदल होते. एका दिवसात ३७० कायदा रद्द होतो. मग एका दिवसात नराधमाना फाशी का होत नाही. बदलापूर शहरात झालेल्या घटनेचा आता महाराष्ट्रात ठीक ठिकाणी निषेध केला जात आहे. अजून नारा धमाना किती खाऊ घालायचं कधी फाशी देणार