डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती_संभाजीनगर येथील सिद्धार्थ मैदान येथे उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. तसेच या संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार .भागवत कराड, डॉ.कल्याण काळे, संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रा.रमेश बोरनारे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.