पोलादपूरमधील गोरक्षकांनी जीवावर उदार होऊन गोमातेला वाचवले ! जावेद वालवटकरच्या मुसक्या आवळल्या तर अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल!

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे

पोलादपूर:- महाबळेश्वर मार्ग वर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक यांनी वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडला आहे . सदरची घटना ९ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलादपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत जावेद दाऊत वालवटकर वय ५८ रा. मुरुड यास अटक केल्याची माहिती पोलादपूर पोलीस मार्फत देण्यात आली.

वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली आहे.

रात्री आरोपी जावेद वालवटकर हा एम एच ०८ ओ.पी. ५३५२ महिंद्रा बोरेलो पिकअप मध्ये सहा गोवंश गाईंना घेऊन नफ्याच्या उद्देशाने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गो तस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गाईंना जीवदान मिळाले असून आरोपी जावेद वालवटकर याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचे कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच या घटनेबाबत १३ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर,सज्जाद,रियाज कचकोल,आसिम कुदेकर,फाईक मदगडी,नाशिर हकीम,रफिक उलडे,मोतशीम,नईफ बाबर, शाहिद खान,इरफान,अन्वय सय्यद,मंगोष खेडेकर अशी आरोपींची नावे असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.

मिळून आलेला माल बोलेरो पिकअप नं एम.एच.०८ ओ.पी.५३५२ किंमत ५,००,०००, एक तांबड्या रंगाची गाय, मोठे शिंग असलेली किंमत ३०,०००, एक ताबड्या रंगाची गाय, मोठे शिंग असलेली किंमत ३५,०००, एक तांबड्या रंगाची गाय, आखुड शिंग असलेली किंमत . २५,०००, एक गर्द तांबंड्या रंगाची गाय, लांब शिंग असलेली किंमत . २०,०००, एक काळया रंगाचा वासरु आखुड शिंग असलेली किंमत १५,००० एक ताबड्या रंगाचा कालवड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या गुन्ह्याची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारणा १९९५ चेक कलम ५,५ (अ).( ब) ९,११

महाराष्ट्र कीपिंग मुव्हमुंट ऑफ कॅटर इन अर्बन एरिया कंट्रोल ऍक्ट कलम ३ पशु क्रूरता अधिनियम कलम ११(१) पशु वाहतूक अधिनियम कलम ४७ अ, ब कलम ४८ ५४(१,२,३) मो. वा.का.क.६६/१९२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा अधिक तपास महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने,पोलीस ठाणे अंमलदार पो. ह. श्री कोंडाळकर हे करीत आहेत.