बदलापूरमध्ये शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा रेलरोको..

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे..

बदलापूर-शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको आंदोलन केले असून यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्याने लोकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, तर काही सफाई कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज नागरिकांनी शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247