बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा अखेर मृत्यू; अक्षयचा एन्काऊंटर? स्वसंरक्षणासाठी पोलीसांचा गोळीबार.

Share news

प्रतिनिधी प्रविता हिरवे

मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊन्टर केला आहे. ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले. साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले असता अक्षयने शेजारी बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडील बंदुक हिसकाऊन घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या. यात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले.

 

यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ३ गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकारी यांना तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेले. मात्र अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.