भारतीय बुध्दिबळपटू प्रज्ञानंदचे शाळेत धमाकेदार स्वागत; पाहा व्हिडिओ.

Share news

भारताचा लिट्ल मास्टर बुध्दिबळपटू प्रज्ञानंदचे त्याच्या शाळेत धमाकेदार स्वागत करण्यात आले. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक पटकवल्यानंतर प्रथमच तो शाळेत आला..

यावेळी रथातून त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि मुख्य म्हणजे त्याची आई जी नेहमी त्याच्या सोबत असते तिलाही या रथात बसवण्यात आल होत. तिच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाबद्दलचे कौतुक आणि अभिमान दिसत होता. शाळेत पोहचताच त्याला एक मोठा हार घालून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

येवढ्या कमी वयात यशाची चव चाखनारा प्रज्ञानंद हा मुलांसाठी प्रेरणा बनत आहे. यापुढेही तो असेच यश संपादन करून भारताचे नाव मोठे करेल यात शंका नाही.

हा व्हिडिओ तुमच्या मुलांनाही दाखवा ज्यातून ते प्रेरणा घेतील.