साताऱ्याच्या आदितीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत डंका; तिरंदाजीत भारतीय संघाला सांघिक सुवर्ण पदक.

Share news

सातारा तालुक्यातील शेरेवाडी या छोट्याशा गावातील आदिती स्वामीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक आटकेपार नेला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १२ व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध साधला. त्यामध्ये आदिती स्वामीचे यश झळाळून निघाले. तिने ज्योती वेण्णम, प्रणित कौर यांच्यासोबतीने चायनीज तैपईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीच्या या यशाने सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा दबदबा आणखी वाढला असून आता लक्ष तिच्या वैयक्तिक कामगिरीकडे लागले आहे.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवून आदिती स्वामीने यापूर्वीच जगाच्या नकाशावर नवा इतिहास लिहिला आहे. आदितीच्या कामगिरीमुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव उंचावले असताना आदितीने गुरुवारी आपल्या सुवर्णमय कामगिरीचा सिलसिला कायम राखला. हाँगझोऊ या ठिकाणी सुरू असलेल्या एकोणीसाव्या एशियन गेम्स धनुर्विद्या (तिरंदाजी) स्पर्धेमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली.

आशियाई स्पर्धेत सांघिकमध्ये आदितीच्या सुवर्णमय कामगिरीबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.

Local News 247 Local News 247