भारत देश अनेक असंख्य रहस्यमय गोष्टींचा खजिना आहे. काही गोष्टींची उत्तरे शास्त्रज्ञांना सुद्धा मिळाली नाहीत. भारतात अशी अनेक पुरातन मंदिरे आहेत ज्यांच रहस्य अजूनही उलगडू शकलं नाही. अशाच काही रहस्यमय मंदिरांची आज आपण माहिती घेणार आहोत.
मेहंदीपूर बालाजी मंदिर
राजस्थानमधील दौसा येथे असलेले मेहंदीपूर बालाजी मंदिर पुजार्यांकडून भूतबाधा उतरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोक येथे नकारात्मक घटकांच्या पकडीतून मुक्त होण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट देतात. या मंदिरात विचित्र वातावरण असतं लोक येथे वेगळे वागताना दिसतात. या मंदिरात भगवान हनुमानाची पूजा केली जाते. येथे हनुमानाच्या छातीत एक छिद्र आहे ज्यातून पाणी वाहत असत. लोक अस मानतात की यातून त्यांचा घाम वाहत असतो.
अनंतपद्मनाभ तलावातील मंदिर
केरळमधील एका तलावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. अनंतपद्मनाभ मंदिराचे रक्षण एक मगर करते जिने कधीही मानवावर हल्ला केला नाही किंवा कधीही त्याचे मांस खाल्ले नाही. ही मगर शाकाहारी आहे. बाबिया नावाची ही मगर 70 वर्षांहून अधिक काळ तलावात राहतेय. 9व्या शतकात बांधलेल्या मंदिरात भगवान विष्णूच्या 10 अवतारांचे चित्रण करणाऱ्या लाकडी कोरीव कामांचा एक अनोखा संग्रह येथे पाहायला मिळतो.
कामाख्या देवी मंदिर
आसाम मधील कामाख्या देवी मंदिर हे भारतातील एक अतिशय शक्तिशाली मंदिर आहे. हे स्त्रीत्व आणि मासिक पाळी यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की या मंदिरातील देवीला दरवर्षी पावसाळ्यात रक्तस्त्राव होतो. हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. मंदिर भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की देवीच्या मासिक पाळीच्या वेळी पाण्याखालील जलाशय लाल होतो आणि यावेळी मंदिर बंद राहते.
सूर्य मंदिर
कोणार्कचे सूर्यमंदिर हे स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य आहे. हे राजा नरसिंह १ च्या कारकिर्दीत बांधले गेल्याची नोंद आहे. तज्ञांच्या मते, मंदिराच्या अद्भुत रचनेमुळे सूर्यप्रकाशाची पहिली किरणे मुख्य प्रवेशद्वारावर पडतात . सूर्याच्या रथाच्या आकाराचे हे मंदिर आहे. ज्याला २४ चाके आहेत. या मंदिराचा युनिस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मधे समावेश करण्यात आला आहे.
कैलास मंदिर
कैलास मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. १६व्या शतकातील महाराष्ट्रातील एलोरा गुहांमध्ये खडक कापून बनवलेले, कैलास मंदिर एकाच खडकावर बांधलेले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 30 दशलक्ष संस्कृत संदेश या मंदिरात कोरले आहेत ज्याचा अर्थ आजही लागलेला नाही. कोणत्याची प्रगत तंत्रज्ञानाशिवाय एकच दगडात हे अद्भुत मंदिर कसकाय बांधण्यात आलं हे आजही न सुटलेले कोड आहे.