श्रीतिर्थक्षेत्र भगवान गडाचे चतुर्थ उत्तर अधिकारी हभप महंत डॉ.कृष्णा महाराज यांची घोषणा..

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र भगवान गड येथील भगवान बाबा समाधी असलेल्या भगवान गडाचे उत्तराधिकारी एकनाथवाडी तालुका पाथडीं येथील श्रीश्रेत्र निरंजन संस्थानचे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी निवड केली आहे.

महंत डॉ.कृष्णा महाराज शास्त्री यांनी भगवानगडावरती विद्यापीठात न ज्ञानेश्र्वरीचे शिक्षण घेतले आहे महंत कृष्णा महाराज शास्त्री हे भगवान गडावरती चांगला विकास करतील असा ठाम विश्वास महंत नामदेव शास्त्री यांना आहे म्हणुनच महंत डॉ. कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे त्यांचे पाथर्डी सह अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, नाशिक, मुंबई संभाजीनगर,नांदेड पुणे सह संपुर्ण महाराष्ट्र व तेलंगाना, राज्यस्थान याही राज्यात सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे