प्रतिनिधी /संदीप द्रौपदी तुकाराम लाड
श्रीवर्धन तालुक्यातील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रुप ग्रामपंचायत साखरोणे कार्यालयाचे उदघाटन दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांचे हस्ते संपन्न झाला.
ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही बहुतांशी ग्रामपंचायती या लोकसंख्येने लहान आर्थिक दृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील आहेत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय नाही याकरिता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय योजना आणण्यात आली आहे ही योजना साखरोणे येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर यांच्या अथक प्रयत्नांनी आणली गेली आहे
या सोहळ्यानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख श्री.अनिल नवगणे, माजी आमदार श्री. तुकाराम सुर्वे तालुकाप्रमुख श्री.अविनाश कोलंबेकर, पंचायत समिती माजी सभापती श्री.बाबुराव चोरगे ,तालुका समन्वयक श्री.दिपक देवकर,युवासेनेचे शिवराज चाफेकर,सागर जाधव
सहसंपर्कप्रमुख श्री.जगन्नाथ चालके उपसरपंच सौ. मालतीताई पवार , शाखा प्रमुख श्री.अशोक घाग, उपशाखा प्रमुख श्री. रमेश कासरूंग धारवली गावचे शाखाप्रमुख श्री.दत्ताराम पवार आणि ग्रामपंचायत सदस्य
यांच्यासह साखरोणे व धारवली गावातील निष्ठावंत शिवसैनिक महिला व तरूण मोठया संख्येने उपस्थित होते.