आप करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची पाहणी..

Share news

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाची निवेदा मूळ बजेट पेक्षा 29 टक्क्याने कमी आली पुणे महानगरपालिका स्थायी समितीने व अभियंता भवन रचना कार्यालय यांनी निविदेला मान्यता दिली आहे. ज्यांनी निविदा दाखल केली त्यांचे नाव तेजस गंगाधर भोसले असे समजते आहे. आम आदमी पार्टी अनुसूचित जाती तर्फे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी त्या निविदाचे हार्दिक असे स्वागत केले तेजस भोसले प्रामाणिकपणे कुठलीही टक्केवारी कोणालाही न देता ड्रेनेज लाईन चेंबर ची कामे स्वच्छतागृहाच्या पाईपलाईन स्टाईल स्वच्छतागृह भांडी प्लंबिंग दरवाजे बदलणे इमारतीमध्ये विविध गळतीची कामे व इतर असलेले कामे काढलेल्या निविदा नुसार पूर्ण काम करणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास आपल्या वरती फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये असा देखील प्रश्न उपस्थित केला

त्याचे कारण या वस्तीग्रहत पर राज्यातील किंवा राज्यातील परिस्थिती नसलेल्या गरजूवंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये एससी एसटी इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी पुणे महानगरपालिका राज्य सरकार चांगल्या सुविधा देणे अपेक्षित असतं परंतु विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे शैक्षणिक नुकसान सध्या डेंगू व कावीळीमुळे विद्यार्थ्यांचा जीव जाणे अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये शासकीय हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसतोय देर आये दुरुस्त आये या म्हणीनुसार आत्ता निविदा काढून तातडीने पूर्ण काम करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

आप चे दहा हजारांचे सिस्टमंडळ 11 तारखेला हॉस्टेलची पाहणी तसेच मुलांशी संवाद साधनार आहे. त्याची परवानगी पुणे महानगरपालिका उपायुक्त समाज कल्याण विभाग यांना दिले आहे.

Local News 247 Local News 247