नुजिवीडु सीड्स लिमिटेड कंपनीतर्फे भव्य भात-पीक पाहणी मेळावा संपन्न.

Share news

पालघर : दिनेश आंबेकर

जव्हार : नुजिवीडु सीड्स लिमिटेड तर्फे चांभारशेत (वांगडपाडा) येथे भात-पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तर्फे भात – बियाणे निवड खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाताची कापणी व झोडणी करून एकरी उत्पन्न काढून दाखवण्यात आले.तसेच शेती सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत शेती कशी करायची,त्या मध्ये कोणते खत वापरायचे की नाही वापरायचे तसेच त्याच्यावर किड पडली तर काय करणार,ही सर्व माहिती दिली.आणि शेती या प्रकारे केली तर किती उत्पन्न मिळेल, त्याची पाहणी कशी करावी लागते.ही सर्व माहिती ही नुजिवीडु कंपनी चे रिजनल मॅनेजर प्रशांत काठोळे यांनी सर्व माहिती आपल्या लोकांना सांगितली.तसेच सदर कार्यक्रमास नुजिवीडु या कंपनीचे सर्व भात-पीक वाणांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पंचकृषितील आजू बाजू च्या सर्व गावापाड्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणे उपस्थित होते,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. चांभारशेत सरपंच योगिता दीपक जाबर.माजी सरपंच रतिलाल पडवळे आणि गणपत भेसकर हे उपस्थित होते,व कंपनीचे रिजनल मॅनेजर प्रशांत काठोळे सर यांनी मार्गदर्शन केले,या कार्यक्रमासाठी सुशील पाटील,भूषण भोये व अरुण नडगे यांनी परिश्रम घेतले .

Local News 247