आदिशक्ती जगदंबा माता श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे नवरात्री उत्सवास मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात..

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु हे गाव प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे जवळच ओझर बंधारा सुपरिचित आहे 

प्रवरा नदी मध्ये भागी हे आदिशक्ती जगदंबा माता मंदिर आहे हे मंदिर खुपचं पुरातण आहे येथे गुढीपाडव्यानंतर सातव्या दिवशी व आठवल्या दिवशी मोठा यात्रा उत्सव असतो व संपुर्ण आषाढ महिना खुप भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते

नवरात्री पहिल्या दिवशी काळुबाई सातारा व येडुआई ते ओझर बु येथे पायी ज्योत वाजत गाजत आणली सकाळ व संध्याकाळी आरती करण्यात येते व दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठया प्रमाणात गर्दी असते यावेळी ही मदिरावरती व परिसरात आकर्षक विघुत रोषणाई करण्यात आली आहे व संध्याकाळी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

आदिशक्ती जगदंबा माता श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य येथे जास्तीत जास्त मोठया प्रमाणात भाविक भक्तांनी दर्शनासाठी यावे व दर्शन करून प्रवरा नदीच्या प्रात्रातील रांजण खलगे पण बघावेत

असे आवाहन आपणांस आदिशक्ती जगदंबा माता श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु यांच्या वतीने करण्यात येत आहे