आमच्यासाठी शेतकरी खरा हिरो, मात्र त्यांनी आत्महत्या करू नये; कपिल देव यांचे आवाहन..

Share news

प्रतिनिधी:- दिलीप निकम तळा

शेतकरी आमच्यासाठी हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केले की मला फार वाईट वाटतं, शेतकऱ्यांनी परिस्थितीशी लढून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी केलं आहे. नांदेड येथील एका खाजगी कृषी कंपनीच्या कार्यक्रमाला कपिल देव यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.   

देशातील शेतकरी सगळ्यांना अन्नपुरवठा करतात. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जेव्हा मी ऐकतो अथवा वाचतो तेव्हा मला फार वाईट वाटतं. वाईट काळ येतो तेव्हा आपण पण शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे, आयुष्यात प्रत्येकाने धिराने लढलं पाहिजे. शेती पिकाच्या भाव वाढीबाबत लक्ष द्यावे लागेल. शेतकरी कष्ट करून संपूर्ण देशाचे पोट भरतात, त्यांना त्रास होत असेल तर आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. असेही कपिल देव यावेळी म्हणाले.

हिंदुस्थानात शेतकरी आणि सैनिक त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही देशातील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. एखादी कंपनीने काही चुकीचे केल असेल तर सगळ्या कंपन्यांना आपण चुकीचं ठरवू शकत नाही. हिंदुस्थानात शेतकरी आणि सैनिक त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. शेतकऱ्यांना मी एवढं सांगेल पूर्ण देशाचे पोट तुम्ही भरता.

तुम्ही नाहीतर आम्ही नाही, जेवढे कष्ट शेतकरी आणि सैनिक करतात तेवढे कष्ट कोणीही करत नाही. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी शेतकरी हिरो आहेत. सरकार सरकारचं काम करेल, आपण काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सकारात्मक बातम्या देणेही गरजेचे असल्याचे मत कपिल देव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.