संत सेना केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करा – राष्ट्रीय नाभिक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

संतसेना केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे व निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा 30 सप्टेंबरला मुंबई येथील असाच मैदानावर राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे जिल्हा मुख्य सचिव डॉक्टर प्रकाश सवडतकर यांनी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे,

पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नाभिक समाजाचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की नाभीकांची आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती नाजूक आहे हलाखीची आहे त्याकरिता राज्य शासनाने ५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळ अंतर्गत संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या (उप कंपनी ) ची स्थापना केलेली आहे.

परंतु केशाशिल्पी महामंडळ कारणीभूत करून निधी उपलब्ध करून द्यावा,निधीची मर्यादा 1000 कोटी पर्यंत वाढवावा मंजूर निधीपैकी 50 टक्के निधीचा विनयोग कर्ज प्रकरण 50 टक्के निधीचा विनियोग बांधकाम व इमारत कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर विविध अनुदानित योजनेच्या स्वरूपात करावा,वंश परंपरागत व्यवसाय करणारे सलून धारकांना केश शिल्पाचा लाभ मिळावा,जाचक अटी व शर्ती रद्द करण्यात याव्या,ग्रामीण व शहरी भागातील सलोन दारकांसाठी शासनाच्या विकास अंतर्गत शॉपिंग सेल उपलब्ध करून देण्यात यावा,जातीनिहाय जनगणना करण्यात यावे म्हणजे आरक्षणाचा साक्षीदार होईल अशा विविध मागण्यासाठी दिनांक २० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आली आहे या निवेदनावर,जिल्हा मुख्य सचिव डॉ प्रकाश सवडतकर,राष्ट्रीय नाभिक संघटना,जिल्हाध्यक्ष दत्ता मोतेकर,जिल्हा उपाध्यक्ष हरिदास जाधव,तालुका अध्यक्ष विलास चित्रे,शहराध्यक्ष प्रदीप जाधव तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव गजानन राऊत राम राऊत विष्णू वैद्य,अमोल वखरे,यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत,