ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक येथील ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात..

Share news

प्रतिनिधी- नाशिक

ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक येथील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 22/09/2024 रोजी ग्रामसेवक भवन तिडके कॉलनी ,येथे घेण्यात आली.

चेअरमन श्री प्रमोद ठाकरे, व्हाईस चेअरमन श्री दत्ता गायकवाड, सोडून कोणतेही संचालक मंडळ बैठकीला उपस्थित नव्हते. त्यात

प्रश्न विचारणारे, श्री योगेश बापू पगार, संचालक देवळा, श्री सुनील पवार संचालक मालेगाव, श्री रविंद्र ठाकरे, जिल्हा अध्यक्ष व श्रीमती माया मोढे ,जिल्हा सचिव, श्री विजयराज जाधव, उपाध्यक्ष, श्री संजय बाविस्कर, जिल्हा मार्गदर्शक, व श्री विजय पवार,, रत्ना भोजने, मुक्ता गोरे, श्री रवींद्र पवार, श्री भदाणे, श्री. विनोद अहिरे, ही पंकज पवार, श्री जगन्नाथ शिंदे, श्री रोषण सूर्यवंशी, काटे बापू, श्री श्रावण वाकचौरे, स्वप्निल ठोके, आदी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक यांनी सभासदांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला व पतसंस्थेच्या कर्ज वाटप,सभासदांच्या अडीअडचणी, कायदेशीर कारभाराविषयी विचारणा केली असता कोणताही जाब जबाब न देता संपूर्ण सभा एकाकी गुंडाळून सुरू न होता बंद करून टाकली….!

आदर्श गावाची संकल्पना मांडणारे ग्रामसेवक आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आदर्श गाव निर्माण करत आहे अशा आदर्श गाव निर्माण करणाऱ्या ग्रामसेवकांच्या पतसंस्थेमध्येच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले तर आदर्श म्हणावे की नहीं ही चिंतेची बाब आहे अशीच आजची सभा वादळी ठरली ती म्हणजे सभासदांचा हक्काचा आणि मेहनतीची संस्था ही आज पर्यंत विश्वास व प्रामाणिकतेवर सुरू होती.

परंतु एखाद्या व्यक्तीला मान दिला की मालक बनायला लागतो याची प्रचिती आज या संस्थेत बघायला मिळाली.

यासाठी एक त्रयस्थ गट आधीच संस्थेच्या ईमेल वरती संस्थेच्या होणाऱ्या तक्रारी , हुकूमशाही बाबत ई-मेल पाठवलेला होता सभासदांची मागणी वरून कार्यकारी मंडळाने हस्तक्षेप करून दबाव तंत्र वापरून सभा घेऊ नये .सभासदांची उत्तर देऊन शंकेचे निरसन करून त्याची छायांकित सही सह प्रत मिळावी अशी आग्रही मागणी केलेली होती.

विषय पत्रिकेनुसार सुरुवात जरी झाली तरी वार्षिक अहवाला मधील असलेल्या आकडेवारीचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने त्या आकडेवारीचा विवरण व त्याची लेखी स्वरूपात माहिती तात्काळ मिळावी याबाबत संस्थेच्या ईमेल आयडी वरती जाहीर विनंती पत्रक त्यांनी सादर केले होते पाठविले होते.त्याची कुठेच दाखल ना घेतल्याने सभासद आधीच चिडले होते.सभेची गोंधळ अवस्था होऊन सभासद वैयताकुन निघून जातील या रचनेनुसार आधीच साऊंड सिस्टीम बाअडखळत बंद करण्यात आली होती

सभासदांची रास्त मागणीनुसार विषय पत्रिकेनुसर सभा घेऊन सभासद सभागृहामध्ये आले होते, परंतु सत्ताधारी पक्षाने सभासदांना कोणतेही प्रकारची संधी न देता हुकूमशाही,राजेशाही पद्धतीने हुकूमशाही व दरारा तयार करून सभेचे कामकाज मर्जीनुसार सुरू केले. सभेचे कामकाज चालू झाल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची समर्थक उत्तर न देता दांडगाई करून हुकूमत करून सभा मोडकळीस आणली.त्यावर चिडलेले सभासदांनी आवाज उठवला यामुळे घाबरलेले अध्यक्ष व सत्ताधारी यांनी सभेमधून सभेचा कोरम अपूर्ण असतानाही , सचिव नसतांना सभेतील सभादांचा आक्षेप असताना सभा सुरु केली पहिलाच विषय 3 मागील सभेचे इतिवृत्त ना मंजूर झाले भीतीने पुढील विषय न घेत ते स्वतःच विषय वाचून स्वतःच मंजूर म्हणून आरोळ्या मारू लागले अचानक स्वतःच राष्ट्रगीत म्हणायला लागले व सभा संपले असे जाहीर करून निघून गेले.

श्री श्रेष्ठींच्या चक्रव्यू रचनेप्रमाणे आर्थिक प्रलोभन देऊन कोरम पूर्ण करण्यासाठी सांगितले.याची व्हिडिओ चित्रण विरोधी गटाने करून घेतले.संस्थेच्या मागील 30 वर्षात अशी सभा झालेली नाही किंवा असे चेअरमन लाभले नाहीत .

सभेचे कामकाज हे राष्ट्रगीताने होत असतानाही सत्ताधारी पक्ष राष्ट्रगीताचा अवमान करून त्या ठिकाणी न थांबता पळून जाण्यात यशस्वी ठरले .

यामुळे उपस्थित सभासदांना अचंबित प्रसंगाला तोंड द्यावे लागले. अशा स्वरूपामध्ये सभासदांना या दबाव तंत्राचा वापर करून आपनासह संस्थेची फसवणूक होत असल्याचे भासत आहे.

यावेळी वंदे मातरम् ची घोषणा देऊन

सभेचा जाहीर निषेध केला.

‘ *एकतर आमचे प्रश्नांचे उत्तरे द्या नाहीतर खुर्च्या खाली करा ‘*

असा शब्दात निषेध सभासदांनी व्यक्त केला

या पत्रकामध्ये वार्षिक अहवालामध्ये केलेली तफावत मध्ये खर्चाच्या बाबी

खर्चाची बाब असेल प्रिंटिंग साहित्य असेल कर्मचाऱ्यांना वाटप येणारा प्रवास भत्ता व बैठक भत्ता असेल,

अशा स्वरूपाच्या सर्व बाबींमध्ये कुठल्या प्रकारची वित्तीय खर्च न करता परस्पर रखमा काढून घेतल्या .

मालेगाव येथे जमीन खरेदी करताना वीस लाख रुपये त्या ठिकाणी चेक द्वारे काढले परंतु एक कोटी रुपयांची जमीन खरेदी करून ती सत्ताधारी पक्ष मधील एक व्यक्तीच्या नावाने स्वतःच्या नावाने खरेदी करून आज रोजी वापरात आहे. या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार झालाचा आरोप सभासदांनी व्यक्त केला.परंतु सत्ताधारी यांनी याबाबत चे आरोप फेटाळले

Local News 247