शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा अंबरनाथ येथे उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला..

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे

अंबरनाथ – महाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण -डोंबिवली- अंबरनाथ -बदलापूर शिवसैनिक रहीवाशीयांचा मेळावा दि २२ रोजी स्वामी समर्थ हॉल, वडवली ,अंबरनाथ पूर्व येथे शिवसेना युवा सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या मेळाव्यासाठी उपस्थित पोलादपूर महाड माणगांव चे आमदार भरतशेठ गोगावले, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे “आमदार श्री डॉ बालाजी किनीकर” तसेच जिल्हा द रायगड सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, अंबरनाथ महानगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष सुनील चौधरी कल्याण पूर्व चे नगरसेवक विशाल पावसे,महिला विधानसभा संपर्कप्रमुख शलाका पाटील, तालुका संपर्कप्रमुख इकबाल चांदले पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव मानगाव तालुका संपर्कप्रमुख राकेश तूपट सह संपर्कप्रमुख महाड तालुका प्रमोद गोगावले अंबरनाथ नगरपालिका नगरसेवक सुभाष साळुंके महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक सुभाष साळुंके यांनी उपस्थित मान्यवरांचा शालपुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, तसेच परिवहन महामंडळ पदी नियुक्ती झाल्याबद्दल पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत मोरे यांनी देखील सत्कार केला.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247