बचतगटातील महिलांना दिवाळी मेणपणत्या प्रशिक्षण उत्साहात संपन्न..

Share news

पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी 

वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत योगिताताई गोसावी यांनी महिलांसाठी मेणपणत्या प्रशिक्षण आयोजित केले होते. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानले जाते. सर्व परिसर दिव्यांच्या रोशनीने प्रकाशमान होतो. सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो.

त्यामुळे दिवाळीत विविध आकाराच्या व डिझाईनच्या पणत्या दिवे यांना खूप मागणी असते म्हणूनच महिलांना मेणपणत्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यातून त्यांना व्यवसाय करून उत्पन्न मिळवता येईल या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले. सुनंदा जाधव यांनी हे प्रशिक्षण दिले. गुलाब, कमळ, मोदक, बुंदीचा लाडू असे विविध प्रकार करून दाखवले. वसुंधरा महिला बचतगटातील व संयोगीता महिला बचतगटातील महिलांनी या प्रशिक्षणचा लाभ घेतला.