सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओझर तीस वर्षांची परंपरा कायम राखत स्वच्छता अभियाने सुरुवात..

Share news

जव्हार : सुनिल जाबर

जव्हार तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव युवा परिवर्तन ओझर यांच्या वतीने गावामध्ये एक गाव एक गणपती तीस वर्षांची परंपरा कायम राखत या वर्षी स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम राबवून सुरुवात करण्यात आली.

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव गेली तीस वर्षा पासून एक गाव एक गणपती हा उपक्रम गावामध्ये राबवण्यात येत आहे या दरम्यान अनेक आरोग्य शिबीर, राणभाजी महोत्सव, आदिवासी कला,संस्कृती नृत्य तारपानाच , गौरीनाच , तुरनाच रस्सी खेच ,नेमबाजी , तसेच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम व खेळ घेतले जातात त्याच बरोबर गावातील एकोपा टिकून रहावी व गाव एकत्र यावा भांडण तंटा विसरून सर्व गाव एकत्र यावा यासाठी गणेशउत्सव मंडळ ओझर प्रयत्नशील आहे.यामधे गावातील बहुसंख्य तरुण मंडळ यांचा सहभाग होता यामध्ये गावातील मुख्य रस्ते,सार्वजनिक ठिकाणे, जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता व गणेश मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

या दरम्यान उमेश कवाड, बबन वांगड, अरुण फडवळे, सदू रामचंद्र पाटील, सुरेश कवाड,नितिन कवाड,नितिन फडवळे, अजय टेंबरे , मनोज फडवळे, राहुल नडगे, आशिष फडवळे, पांडू फडवळे, निलेश नडगे, निलेश राजड, दिनेश काटेला, पंकज कवाड, जगदीश काटेला, गौरव वांगड, मयूर फडवळे, अक्षय फडवळे मनोज कडु, अविनाश वांगड, राजू फडवळे, रोहित कवाड,चींतू पाटारे, संजय गुरव. इत्यादी तरुण मंडळाने या उपक्रमात सहभाग घेतला.

Local News 247