श्रीक्षेत्र गोदाधाम चे महंत हभप रामगिरी महाराज यांना ह भ प अमोल महाराज यांचे कीर्तनातून चेंडू फळ ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा..

Share news

छत्रपती संभाजी नगर //वैजापूर प्रतिनिधी रवींद्र पवार 

वैजापूर तालुक्यातील गोदावरी वसलेल्या श्रीक्षेत्र चेंडू फळ येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 32 वे परम पूज्य गुरुवर्य ह भ प ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज महंत श्रीक्षेत्र गोदा धाम परमपूज्य गुरुवर्य ह भ प रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने राम दरबारचे मठाधिपती ह भ प प्रेम मूर्ती हरी शरण गिरीजी महाराज तसेच शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती ह भ प संदिपानजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा ह भ प अमोल महाराज बडाख यांनी दिली

श्रीक्षेत्र पंचाळे ता सिन्नर जी नाशिक या ठिकाणी गुरुवर्य रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याला महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी लाखोच्या संख्येने समर्थन मिळत असून त्याचेच प्रतीक म्हणून आज चेंडू फळ येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रामस्थांनी गुरुवर्य रामगिरी महाराज यांना जाहीर पाठिंबा दर्शविला

परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज यांचे बाजाठाण या ठिकाणी बरेच वर्षे वास्तव्य असल्यामुळे त्यांचे लाखो भाविक भक्त या परिसरात असून भाविक मोठ्या ताकतीने महाराजांसोबत आहे

परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या बद्दल ज्यांनी ज्यांनी अपशब्द वापरले त्या संबंधित देवगाव शनी बाजाठान चेंडू फळ ग्रामस्थांनी विरगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावी अशा आशयाचे निवेदन देखील दाखल केलेले आहे.

Local News 247 Local News 247